शुभेच्छा

  स्थापना व उद्दिष्ट  
     
 
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था ही समस्त ब्राह्मण समाज संघटित करण्याकरीता निर्माण झालेली एक शक्ती आहे. सर्व
शाखीय ब्राह्मण समाजाने एका व्यासपीठावर यावे, आचार, रूढी, कुलाचार, व्रतवैकल्ये यामध्ये कालानुरूप बदल करून विज्ञाननिष्ठ पायावर ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीकरीता प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. संघटीत ब्राह्मण हाच पाया आहे. तसेच या वाटचालीत आपण हिंदू समाजाचे एक बांधव आहोत हा विचार प्रामुख्याने पुढे ठेवला पाहिजे आणि याच हेतूने कै. शंकरराव तथा मामाराव दाते यांनी १९७२ साली समस्त ब्राह्मण समाज संघटित करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली. माजी पोलीस कमिशनर कै. श्री. प. मराठे, अभिनेते कै. भालबा केलकर, उद्योगपी कै. भाऊसाहेब काळे, तसेच नटवर्य श्री. प्रभाकर पणशीकर, डॉ. नी. क. कुलकर्णी, श्री. चंद्रशेखर जोशी यांसारख्या मान्यवरांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आजपर्यंत सांभाळली आहे.
   
संस्थेतर्फे दर वर्षी ब्राह्मण समाज संघटित होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम यशस्वीरित्या घेतले जातात. प्रामुख्याने
नोंद घ्यावयाची झाली तर किर्तन सप्ताह, कोजागिरी पोर्णिमा, वर्धापनदिन, रक्षाबंधन, तिळगुळ समारंभ तसेच १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन यांसारखे अनेक उपक्रम ज्ञाती बांधवांनी एकत्रित येण्याकरिता घेतले जातात.
   
ब्राह्मण ज्ञातीबरोबरच इतर समाज बांधवांना एकत्र करून किंवा त्यांच्या कार्याचा गौरव करून संस्था एकसंधपणे गेली
अनेक वर्षे यशस्वीपणे कार्य करीत आहे.
   
दरवर्षी संस्थेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या प्रसंगी संस्थेचा जेष्ठ कार्यकर्ता, शिक्षण
क्षेत्रात निस्वार्थीपणाने काम करणारा, सामाजिक क्षेत्रात काम करणारी महिला यांना सुधाचंद्र व कै. सौ. इक्ष्मीबाई चितळे ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज पावेतो वर्धापन दिन समारंभास मा. प्रभाकर पणशीकर, मा. सुधीर गाडगीळ, मा. दिपक टिळक, माजी महापौर रजनीताई त्रिभुवन, लोकसभा माजी सभापती खासदार मनोहर जोशी, नामदार अजित पवार, खासदार उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुरेश कलमाडी, सिंधुताई सपकाळ, आमदार देवेंद्र फडणवीस, डी.एस. कुलकर्णी आणि युवा पुरस्काराच्या वेळी स्मिता तळवलकर, रविंद्र प्रभुदेसाई, गिरीष बापट, श्रीकांत मोघे, मंगेश तेंडुलकर, सुनील बर्वे, सुधीर गाडगीळ यांसारख्या मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे.
   
आपण संस्थेचे सभासद होऊन संस्था वाढीस मदत करावी ही विनंती. अशा सामाजिक काम करणाऱ्या संस्थेसाठी
आपण खालील गोष्टी करू शकता.
   
१) समाजातील गरीब व गरजू, हुशार विद्यार्थ्यांचे मदतीसाठी आपण सढख हाताने आर्थिक योगदान देऊ शकता.
२) गरजुंच्या आरोग्य सेवेसाठी आर्थिक सहाय्य करू शकता.
३) निराधारांसाठी आर्थिक निधी देऊन त्यांना दिलासा देऊ शकता.
४) आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण संस्थेच्या कार्यात सहभागी होऊ शकता.
५) आपल्या योग्य मार्गदर्शनाचा व कल्पनांचा लाभ संस्थेस देऊ शकता.