शुभेच्छा

  महिला आघाडी  
     
 
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था महिला समिती तर्फे अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यात काही
महत्वाचे कार्यक्रम म्हणजे
 
१. वटपौर्णिमा : हल्लीच्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावणे अतिशय गरजेचे आहे. वटपौर्णिमेला आतापर्यंत
निरनिराळया सोसायट्या व नदीपात्रात वृक्षारोपण केले आहे. वृक्षारोपणाबरोबरच ते जोपासण्याचे काम देखील संस्थेतर्फे केले जाते.
 
२. राखीपौर्णिमा : समाजातील दुर्लक्षित घटक, विशेष मुले, गतीमंद/मतीमंद/अंध मुले यांच्या शाळेत किंवा वसतिगृहात
जावून राखी बांधणे, खेळणी वाटप, खाऊ वाटपाचा उपक्रम केला जातो.
 
३. श्रीसुक्त पठण : प्रत्येक श्रावण मासात श्रीसुक्त पठणाचे आयोजन संस्थेतर्फे केले जाते.
 
४. भोंडला : अश्विन महिन्यातील नवरात्रानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या कालखंडात पारंपारीक पध्दतीने भोंडला केला
जातो.
 
५. तिळगुळ समारंभ : महिला समितीचा तिळगुळ समारंभ हा निरनिराळया सामाजिक संस्थेत तसेच वृध्दाश्रमात जाऊन
साजरा केला जातो. त्याचप्रमाणे एका नवविवाहितेला साडी आणि हलव्याचे दागिने दिले जातात.
 
६. महिला दिन : ८ मे रोजी जागतिक महिला दिन संस्थेतर्फे साजरा केला जातो. त्यात महिला स्नेहमेळावा, महिला व
युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गायनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ९ मार्च २०१३ ह्या साली `स्त्री भ्रुण हत्या आणि महिलांवरील अत्याचार' विरोधात पदयात्रा काढण्यात झाली होती. या पदयात्रेत भावसार समाज, मारवाडी, जैन, गुजराथी समाज तसेच निरनिराळया ब्राह्मण संस्था सहभागी झाल्या होत्या. त्याच दिवशी समाजातील गरजु/गरीब महिलांसाठी काम करणाऱ्या महिलेला `वात्सल्य' पुरस्कार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवतीला `गायत्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.